नटसम्राट - वि वा शिरवाडकर

natsmrat-v-v-shirvadkar-sahityavishva.blogspot,com
नटसम्राट

To Be or not to be
That is the Question
जगावं की मरावं हा एकच सवाल
या दुनियेच्या उकिरडयावर
खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं की फेकून ध्य़ावं देहाचं लक्तर
त्यात गुंडाळल्या जाणिवेच्या यातनेसह मृत्यूच्या कळ्याशार डोहामध्ये ?
आणि करावा सर्वोचा शेवट एकाच प्रहारानं माझा तूझा आणि त्याचाही.
मृत्यूच्या महासर्पानं जीवनाला असा डंख मारावा की
नंतर येणार्या निद्रेला नसावं जागृतीचा किनारा कधीही
पण त्या निद्रेला ही पुन्हा स्वप्न पडू लागलं तर ,
तर - तर इथंच मेख आहे .
नव्या स्वप्नाच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही म्हणून सहन करतो हे जूने जागेपण
प्रेताच्या निर्जिवपणानं अभिमानावर होणारे बलात्कार अस्तित्वाच्या गाभार्यात असलेल्या सत्वाची विटंबना
आणि अखेर करूणेचा कटोरा घेऊन उभे राहतो खालच्या मानेने आमच्या मारेकराच्याच दाराशी .
विधात्या तू इतका कठोर का झालास एका बाजूला,
आम्ही ज्यानां जन्मं दिला ते आम्हाला विसरतात आणि दुसर्या बाजूला,
ज्यानं आम्हाला जन्मं दिला तो तु ही आम्हाला विसरतोस,
मग विस्कटलेल्या हाडांचे हे सापळे घेऊन हे करूणाकरा,
आम्ही थेरड्यांनी कोणाच्या पायांवर डोकं आदाळायचं !

                                                              वि वा शिरवाडकर (नटसम्राट)


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या