क्रौंचवध - वि स खांडेकर


क्रौंचवध मधील काही वाक्ये ...

पुरुष क्षणात फकीर होउ शकतो. पण स्त्री सुखासुखी जोगिण होत नाही
***
मनुष्य स्वभाव किती विचित्र आहे बघा !
पुढे ज्या गोष्टींसाठी लोकांनी आपले कौतुक करावे असे आपल्याला वाटते,
ती गोष्ट आरंभी लोकांपासून आपण लपवुन ठेवतो.मग ते पुस्तक असो नाहीतर अपत्य असो.
***
प्रसंगी प्रिय व्यक्तीचा मृत्यू मनुष्य शांतपणे पाहु शकेल.
पण त्याच्याविषयी विपरीत कल्पनांच्या वावटळी मनात उठू लागल्या म्हणजे मात्र त्याची सहनशिलता नाहीशी होते.
***
रोजनिशी
या डाय-या नाहीत . आपल्या आयुष्यात जि फुले फुलली त्यांचे अत्तर साठवुन ठेवलेल्या कुप्या आहेत या
***
कुठलीही क्रांति अश्रुंनी होत नाही. क्रांतिला एकच नैवेद्य आवडतो.. आणि तो म्हणजे भक्ताच रक्त.
***
लिंबाचे लोणचे मुरले म्हणजे त्याला आंबट गोड रुचि येते!
आयुष्यातल्या जुन्या आठवणीही अश्याच
***
माणुस आपल्या ईवल्या आशांचे बंगले बांधत असतो !
आणि दैव ? दैव हे एक खोडकर मुल आहे. ते चिमुकले बंगले पाडण्यात त्याला विलक्षण आनंद होत असतो
***
एखादि व्यक्ती आपल्या अयुष्यात येते आणि निघुन जाते काळोख उजळण्याकरिता दिव्याने पुढे व्हावे आणि काळोखात लपून बसलेल्या वा-याने तो विझवुन टाकावा तसे झाले हे
***
कळ्या फ़ुलल्याच नाहित तर जग सुगंधाला मुकेल.
***
आयुष्या हि फ़ुलबाग नाही ते समरांगण आहे.
***
शंभर शब्दांनी जे सांगता येत नाही ते ओझरत्या स्पर्शाने व्यक्त करता येते.
***
प्रेम करणे म्हणजे विस्तवाशी खेळणे
***
विषाच भय वाटल म्हणुन अमॄताचा मोह कुणाला सुटला आहे का?
***
दोन पाखरे एका झाडावर थोडा वेळ बसली आणि किलबिल केली म्हणुन काही त्यांची घरटी एक होत नाहित
***
पुरुषाची अभिमानाची आणि स्त्रिची प्रितिची जखम लवकर भरुन येत नाही
प्रिती आणि मदिरा यांचे परिणाम माणसावर पहिल्यांदा तरी सारखेच होतात
***
वेश्या आपल्या सौंदर्याची किरकोळ विक्रि करते.कुलिन स्त्रीने लग्नाच्या रुपाने त्याची घाऊक विक्रि केलेली असते.
***
नऊ महिन्यांचा तो गोड लपंडाव! एकीकडुन जीव घेणारा पण दुसरीकडे जीव गुंतवुन सोडणारा असला खेळच नसेल जगात! निसर्गाने स्त्रिला अनेक शाप दिलेत आणि त्या क्रुर शापांचा विसर पडावा म्हणुनच कि काय
तिला मातॄपदाचा वरही दिला आहे
***
मित्राच्या मॄत्युपेक्षाही मैत्रिचे मरण असह्य असते
***
माणसे जन्माला येतात पण माणुसकि निर्माण करावी लागते.
***
सौंदर्याइतकी सत्याची उपासना सोपी नाही.
***
मॄत्युला हजार डोळे असतात कोण कुठे लपून बसले आहे हे त्याला चटकन दिसते तो हां हां म्हणता हवे त्याला शोधुन काढतो.
***
त्याग हाच प्रेमाचा आत्मा आहे.
***
अश्रु कितिहि पवित्र असले तरि गेलेला प्राण परत आणण्याचे सामर्थ्य त्यांच्यामधे असत नाहि.
***
शब्द,अश्रु आणि रक्त तिघांच्या उगमाचे स्थान एकच,पण त्यांची जगे किती भिन्न?
***
फ़ुल आज ना उद्या सुकायचे असते.मानवी जिवनही तसेच आहे.कोमेजुन जाईपर्यंत फ़ुलाने वास दिला कि त्याच्या जन्माचे सार्थक झाले.
***



टिप्पणी पोस्ट करा

5 टिप्पण्या