श्रीमान योगी -रणजित देसाई

श्रीमान योगी -रणजित देसाई



श्रीमान योगी मधील काही निवडक वाक्ये ....!

- पोरीची जात म्हणजे हळदीबुक्क्याची.कुणीही उचलावी.आणि कुणाच्या हि कपाळी केव्हाही चिकटवावी!

- एक कोड सोडवायला गेलं, कि दुसरं पडतं.!

- बातम्यासुद्धा कधी एकटया येत नाहीत.!

- राजकारण एकपदरी नसतं. ते अनेकपदरी असतं. राजकारण येणाऱ्या प्रसंगा-बरोबर बदलत असतं

- ज्या घरात मुल वाढतं, तिथे कसं वागावं,हे मोठ्यांना कळायला हवं

- लक्ष्मी मागे धावून लक्ष्मी कधी प्रसन्न होत नसते.ती कर्तृत्ववान माणसाच्या पाठीमागून आपोआप येत असते.लक्ष्मी नेहमी पाठीशी ठेवावी; आणि संकटे समोर बघावीत.!

- एक अपयश कदाचित दुसऱ्या यशाची सुरुवात असते .....!

माणसं दोन स्वभावांची असतात.काही मागचा पुढचा विचार करतात. सावधगिरी हा त्यांचा स्वभाव असतो.अपयशाची त्यांना सदैव भीती वाटत असते. त्या अपयशाच्या जागा हुडकण्यात त्याचं मन व्यग्र असतं अशा माणसाचं जीवन स्थिर राहतं; पण त्यांच्या हातून फारसं घडत नाही. दुसरी मनालं पटेल ते करणारी माणसं असतात. परिणामाचा विचार त्यांना नसतो.!

वैर वाढवायला साऱ्यांनाच येतं;पण वैर टिकविण्याची ताकद फार थोड्यांना असते. त्यालाही असामान्य ताकद लागते.

टिप्पणी पोस्ट करा

3 टिप्पण्या